Skip to content

श्रीज्ञानेश्वरमहाराजांची आरती

DNYANESHWAR MAHARAJ AARTI

1 भाग · 6 ओळी

श्रीज्ञानेश्वरमहाराजांची आरती

आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा
सेविती साधुसंत मनु वेधला माझा धृ० आरती०
लोपलें ज्ञान जगीं हित नेणती कोणी
अवतार पांडुरंग नांव ठेविले ज्ञानी ॥१॥ आरती०
प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचि केलें
रामाजनार्दनी पायीं टकचि ठेलें ॥२॥ आरती०