# अनादि अंबिका भगवती - Latin: Anadi Ambika Bhagavati - Collection: अभंग (Abhang) - Source: https://www.amrutvahini.in/abhang/anadi-ambika-bhagavati - Language: Marathi (मराठी), original text, untranslated - Last revised: 2026-09-17 - Tags: अभंग ## गोंधळ अनादि अंबिका भगवती । बोध परडी घेउनी हातीं । पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदो भक्त नाचती ॥१॥ गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ अंबे ॥ध्रु०॥ व्यास वसिष्ठ शुक गोंधळी । नाचताती सोहंमेळीं । द्वैतभाव विसरूनी बळी । खेळती अंबे तुझे गोंधळी ॥२॥ मुगुटमणी पुंडलीक । तेहतीस कोटी देव नायक । गोंधळ घालतील कौतुक । एका जनार्दनीं नाचे देख ॥३॥ --- Reproduced from the source pothi, unaltered. Free to read at https://www.amrutvahini.in. Index of the full archive: https://www.amrutvahini.in/llms.txt