# हेचि थोर भक्ती आवडती देवा - Latin: Hechi Thor Bhakti Avadati Deva - Collection: अभंग (Abhang) - Source: https://www.amrutvahini.in/abhang/hechi-thor-bhakti-avadati-deva - Language: Marathi (मराठी), original text, untranslated - Last revised: 2026-09-17 - Tags: अभंग ## अभंग हेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ ठेविले अनंते तैसेचि रहावे । चित्ती असू द्यावे समाधान ॥२॥ वाहिल्या उद्देग दुःख ची केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ॥३॥ तुका म्हणे घालू तयावरी भार । वाहू हा संसार देवापायी ॥४॥ --- Reproduced from the source pothi, unaltered. Free to read at https://www.amrutvahini.in. Index of the full archive: https://www.amrutvahini.in/llms.txt