# जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ - Latin: Jayachiye Dwari Sonyacha Pimpal - Collection: अभंग (Abhang) - Source: https://www.amrutvahini.in/abhang/jayachiye-dwari-sonyacha-pimpal - Language: Marathi (मराठी), original text, untranslated - Last revised: 2026-06-17 - Tags: अभंग ## अभंग जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ । अंगी ऐसे बळ रेडा बोले ॥१॥ करील ते काय नोहे महाराज । परी पाहे बीज शुद्ध अंगी ॥२॥ जयाने घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवाची ॥३॥ तुका म्हणे तेथे सुखा काय उणे । राहें समाधाने चित्ताचिया ॥४॥ --- Reproduced from the source pothi, unaltered. Free to read at https://www.amrutvahini.in. Index of the full archive: https://www.amrutvahini.in/llms.txt