# पिकलिया सेंद कडुपण गेले - Latin: Pikaliya Send Kadupan Gele - Collection: अभंग (Abhang) - Source: https://www.amrutvahini.in/abhang/pikaliya-send-kadupan-gele - Language: Marathi (मराठी), original text, untranslated - Last revised: 2026-06-17 - Tags: अभंग ## अभंग पिकलिया सेंद कडुपण गेले । तैसे आम्हां केले पांडुरंगे ॥१॥ काम क्रोध लोभ निमाले ठायिंची । सर्व आनंदाची सृष्टी जाली ॥२॥ आठव नाठव गेले भावभाव । जाला स्वयमेव पांडुरंग ॥३॥ तुका म्हणे भाग्य ह्या नावे म्हणीजे । संसारी जन्मीजें याची लागीं ॥४॥ --- Reproduced from the source pothi, unaltered. Free to read at https://www.amrutvahini.in. Index of the full archive: https://www.amrutvahini.in/llms.txt