# संतांचा महिमा तो बहु दुर्गम - Latin: Santancha Mahima - Collection: अभंग (Abhang) - Source: https://www.amrutvahini.in/abhang/santancha-mahima - Language: Marathi (मराठी), original text, untranslated - Last revised: 2026-06-17 - Tags: अभंग ## अभंग संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथे ॥१॥ बहु दुधड जरी झाली म्हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२॥ तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण । तरीच महिमान येईल कळो ॥३॥ --- Reproduced from the source pothi, unaltered. Free to read at https://www.amrutvahini.in. Index of the full archive: https://www.amrutvahini.in/llms.txt