# झणीं दृष्ट लागो तुझ्या सगुणपणा - Latin: Zani Drishta Lago Tujhya Sagunapana - Collection: अभंग (Abhang) - Source: https://www.amrutvahini.in/abhang/zani-drishta-lago-tujhya-sagunapana - Language: Marathi (मराठी), original text, untranslated - Last revised: 2026-09-17 - Tags: अभंग ## अभंग झणीं दृष्ट लागो तुझ्या सगुणपणा । जेणें माझ्या मना बोध केला ॥१॥ अनंता जन्मींचें विसरलो दु:ख । पाहतां तुझें मुख पांडुरंगा ॥ध्रु॥ योगियांच्या ध्यानीं ध्यातां नातुडसी । तो तू आम्हापाशी मागें पुढें ॥३॥ नामा म्हणें जीवें करीन निंबलोण । विटेसहित चरण ओंवाळीन ॥४॥ --- Reproduced from the source pothi, unaltered. Free to read at https://www.amrutvahini.in. Index of the full archive: https://www.amrutvahini.in/llms.txt