# संत नामदेव कृत - Latin: Sant Namdev Krit Mahatmya - Collection: श्रीज्ञानेश्वरी माहात्म्य (Dnyaneshwari Mahatmya) - Source: https://www.amrutvahini.in/dnyaneshwari-mahatmya/sant-namdev-krit-mahatmya - Language: Marathi (मराठी), original text, untranslated - Last revised: 2026-06-17 - Tags: माहात्म्य ## श्रीज्ञानेश्वरी माहात्म्य ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्ली प्रगट केली ॥१॥ गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥२॥ अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥ छपन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारिली ॥४॥ श्रवणाचे मिषें बैसावें येऊनी । साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥ नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओंवी अनुभवावी ॥६॥ --- Reproduced from the source pothi, unaltered. Free to read at https://www.amrutvahini.in. Index of the full archive: https://www.amrutvahini.in/llms.txt