Skip to content

त्रिभंगी देहूडा

TRIBHANGI DEHUDA

1 भाग · 4 ओळी

गवळण

त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळीं वेणु वाजवित आहे ॥१॥
गोविंदु वो माये गोपाळु वो सबाह्य अभ्यंतरीं अवघा परमनंदुवो ध्रु०
सांवळे सगुण सकळा जिवांचें जीवन घनानंद मूर्ति पाहतां हारपलें मन ॥२॥
शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ बाप रखुमादेविवरु विठ्ठलु सकळ ॥३॥