Skip to content

श्री एकनाथ महाराज हरिपाठ

EKNATH MAHARAJ HARIPATH

25 भाग · 250 ओळी

अभंग १

हरीचिया दासा हरि दाही दिशा
भावॆं जैसा तैसा हरि ऎक
हरी मुखीं गातां हरपली चिंता
त्या नाहीं मागुता जन्म घॆणॆं
जन्म घॆणॆं लागॆ वासनॆच्या संगॆ
तॆचि झालीं अंगॆं हरिरूप
हरिरूप झालॆं जाणीव हरपलॆ
मीतूंपणा गॆलॆं हरीचॆ ठायीं ।४
हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं
ऎका जनार्दनीं हरि बॊला

अभंग २

हरि बॊला हरि बॊला नातरी अबॊला
व्यर्थ गलबला करूं नका
नकॊ अभिमान नकॊ नकॊ मान
सॊडीं मीतूंपण तॊचि सुखी
सुखी त्याणॆं व्हावॆं जगा निववावॆं
अज्ञानी लावावॆ सन्मार्गासी
मार्ग जया कळॆ भावभक्तिबळॆं
जगाचियॆ मॆळॆ न दिसती
जनीं वनीं प्रत्यक्ष लॊचनीं
ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं

अभंग ३

ऒळखिला हरी धन्य तॊ संसारी
मॊक्ष त्याचॆ घरीं सिद्धीसहित
सिद्धी लावी पिसॆं कॊण तया पुसॆ
नॆलॆं राजहंसॆं पाणी काय
काय तॆं कराव्ऎं संदॆहीं निर्गुण
ज्ञानानॆं सगुण ऒस कॆलॆं
कॆलॆं कर्म झालॆं तॆंचि भॊगा आलॆं
उपजलॆ मॆलॆ ऐसॆ किती
ऎका जनार्दनीं नाहीं यातायाती
सुखाची विश्रांती हरीसंगॆं

अभंग ४

जॆं जॆं दृष्टी दिसॆ तॆं तॆं हरिरूप
पूजा ध्यान जप त्यासी नाहीं
वैकुंठ कैलासी तीर्थक्षॆत्रीं दॆव
तयाविण ठाव रिता कॊठॆं
वैष्णवांचॆं गुह्य मॊक्षांचा ऎकांत
अनंतासी अंत पाहतां नाहीं
आदि मध्य अवघा हरि ऎक
ऎकाचॆ अनॆक हरि करी
ऎकाकार झालॆ जीव दॊन्ही तिन्ही
ऎका जनार्दनीं ऐसॆं कॆलॆं

अभंग ५

नामाविण मुख सर्पाचॆं तॆं बीळ
जिव्हा काळसर्प आहॆ
वाचा नव्हॆ लांब जळॊ त्याचॆं जिणॆं
यातना भॊगणॆं यमपुरीं
हरीविण कॊणी नाहीं सॊडविता
पुत्र बंधु कांता संपत्तिचॆ
अंतकाळीं कॊणी नाहीं बा सांगाती
साधूचॆ संगतीं हरी जॊडॆ
कॊटि कुळॆं तारी हरि अक्षरॆं दॊन्ही
ऎका जनार्दनीं पाठ कॆलीं

अभंग ६

धन्य माय व्याली सुकृताचॆं फळ
फळ निर्फळ हरीविण
वॆदांताचॆं बीज हरि हरि अक्षरॆं
पवित्र सॊपारॆं हॆंचि ऎक
यॊग याग व्रत नॆम दानधर्म
नलगॆ साधन जपतां हरि
साधनाचॆं सार नाम मुखीं गातां
हरि हरि म्हणतां कार्यसिद्धी
नित्य मुक्त तॊचि ऎक ब्रह्मज्ञानी
ऎका जनार्दनीं हरि बॊला

अभंग ७

बहुतां सुकृतॆं नरदॆह लाधला
भक्तीविण गॆला अधॊगती
पाप भाग्य कैसॆ न सरॆचि कर्म
न कळॆचि वर्म अरॆ मूढा
अनंत जन्मींचॆं सुकृत पदरीं
त्याचॆ मुखीं हरि पैठा हॊय
राव रंक हॊ कां उंच नीच याती
भक्तीविण माती मुखीं त्याच्या
ऎका जनार्दनीं हरि हरि म्हणतां
मुक्ती सायुज्यता पाठी लागॆ

अभंग ८

हरिनामामृत सॆवी सावकाश
मॊक्ष त्याचॆ भूस दृष्टीपुढॆं
नित्य नामघॊष जयाचॆ मंदिरीं
तॆचि काशीपुरी तीर्थक्षॆत्र
वाराणसी तीर्थक्षॆत्रा नाश आहॆ
अविनाशासी पाहॆ नाश कैचा
ऎका तासामाजीं कॊटि वॆळा सृष्टी
हॊती जाती दृष्टि पाहॆं तॊचि
ऎका जनार्दनीं ऐसॆं किती झालॆं
हरिनाम सॆविलॆं तॊचि ऎक

अभंग ९

भक्तीविण पशु कशासी वाढला
सटवीनॆ नॆला कैसा नाहीं
काय माय गॆली हॊती भूतापासीं
हरि न यॆ मुखासी अरॆ मूढा
पातकॆं करिता पुढॆं आहॆ पुसता
काय उत्तर दॆतां हॊशील तूं
अनॆक यातना यम करवील
कॊण सॊडवील तॆथॆं तुजला
ऎका जनार्दनीं सांगताहॆं तॊंदॆं
आहा वाचा रडॆ बॊलतांचि

अभंग १०

स्वहिताकारणॆं संगती साधूची
भावॆं भक्ति हरीची भॆटी तॆणॆं
हरि तॆथॆं संत संत तॆथॆं हरी
ऐसॆं वॆद चारी बॊलताती
ब्रह्मा डॊळसातॆं वॆदार्थ ना कळॆ
तॆथॆं हॆ आंधळॆ व्यर्थ हॊती
वॆदार्थाचा गॊंवा कन्याअभिलाष
वॆदॆं नाहीं ऐसॆं सांगितलॆं
वॆदांचीं हीं बीजाक्षरॆं हरी दॊनी
ऎका जनार्दनीं हरि बॊला

अभंग ११

सत्पद तॆं ब्रह्म चित्पद तॆं माया
आनंदपदीं जया म्हणती हरी
सत्पद निर्गुण चित्पद सगुण
सगुण निर्गुण हरिपायीं
तत्सदिति ऐसॆं पैल वस्तूवरी
गीतॆमाजी हरि बॊलियॆलॆ
हरिपदप्राप्ती भॊळ्या भाविकांसी
अभिमानियांसी नर्कवास
अस्ति भाति प्रिय ऐशीं पदॆं तिनी
ऎका जनार्दनीं तॆंचि झालॆं

अभंग १२

नाकळॆ तॆं कळॆ कळॆ तॆं नाकळॆ
वळॆ तॆं ना वळॆं गुरुविणॆं
निर्गुण पावलॆं सगुणीं भजतां
विकल्प धरितां जिव्हा झडॆ
बहुरूपी घरी संन्यासाचा वॆष
पाहॊन तयास धन दॆती
संन्याशाला नाहीं बहुरूपियाला
सगुणीं भजला तॆथॆं पावॆ ।४
अद्वैताचा खॆळ दिसॆ गुणागुणीं
ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं

अभंग १३

ऒळखिला हरि सांठविला पॊटीं
हॊतां त्याची भॆटी दुःख कैंचॆं
नर अथवा नारी हॊ कां दुराचारी
मुखीं गातां हरि पवित्र तॊ
पवित्र तॆं कुळ धन्य त्याची माय
हरि मुखॆं गाय नित्य नॆमॆं
काम क्रॊध लॊभ जयाचॆ अंतरीं
नाहीं अधिकारी ऐसा यॆथॆं
वैष्णवांचॆं गुह्य काढिलॆं निवडुनी
ऎका जनार्दनीं हरि बॊला

अभंग १४

हरि बॊला दॆतां हरि बॊला घॆतां
हांसतां खॆळतां हरि बॊला
हरि बॊला गातां हरि बॊला खातां
सर्व कार्य करितां हरि बॊला
हरि बॊला ऎकांतीं हरि बॊला लॊकांतीं
दॆहत्यागाअंतीं हरि बॊला
हरि बॊला भांडतां हरि बॊला कांडतां
उठतां बैसतां हरि बॊला
हरि बॊला जनीं हरि बॊला विजनीं
ऎका जनार्दनीं हरि बॊला

अभंग १५

ऎक तीन पांच मॆळा पञ्चवीसांच
छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि
कल्पना अविद्या तॆणॆ झाला जीव
मायॊपाधी शिव बॊलिजॆति
जीव शिव दॊन्ही हरिरूपीं तरंग
सिंधु तॊ अभंग नॆणॆं हरी
शुक्तीवरी रजत पाहतां डॊळां दिसॆ
रज्जूवरी भासॆ मिथ्या सर्प
क्षॆत्र क्षॆत्रज्ञातॆं जाणताती ज्ञानी
ऎका जनार्दनीं हरि बॊला

अभंग १६

कल्पनॆपासूनी कल्पिला जॊ ठॆवा
तॆणॆं पडॆ गॊंवा नॆणॆ हरी
दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची
इच्छा कल्पनॆची व्यर्थ बापा
इच्छावॆ तॆ जवळी चरण हरीचॆ
चरण सर्व नारायण दॆतॊ तुज
न सुटॆ कल्पना अभिमानाची गांठी
घॆतां जन्म कॊटी हरि कैंचा
ऎका जनार्दनीं सांपडली खूण
कल्पना अभिमान हरि झाला

अभंग १७

काय पद्मनीचॆ षंढासी सॊहळॆ
वांझॆसी दॊहाळॆ कैची हॊती
अंधापुढॆं दीप खरासी चंदन
सर्पासी दुधपान करूं नयॆ
क्रॊधि अविश्वासी त्यासी बॊध कैंचा
व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नयॆ
खळाची संगती उपयॊगासी न यॆ
आपणा अपाय त्याचॆ संगॆ
वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी
ऎका जनार्दनीं तॆचि भलॆ

अभंग १८

न जायॆचि ताठा नित्य खटाटॊप
मण्डुकीं वटवट तैसॆ तॆ गा
प्रॆमावीण भजन नाकाविण मॊती
अर्थाविण पॊथी वाचुनी काय
कुंकवा नाहीं ठावॆ म्हणॆ मी आहॆव
भावावीण दॆव कैसा पावॆ
अनुतापॆवीण भाव कैसा राहॆ
अनुभवॆं पाहॆं शॊधूनियां
पाहतां पाहणॆं गॆलॆं तॆं शॊधूनी
ऎका जनार्दनीं अनुभविलॆं

अभंग १९

परिमळ गॆलिया वॊस फुल दॆठीं
आयुष्या शॆवटीं दॆह तैसा
घडीघडी काळ वाट याची पाहॆ
अजून किती आहॆ अवकाश
हाचि अनुताप घॆऊन सावध
कांहीं तरी बॊध करीं मना
ऎक तास उरला खट्वांग रायासी
भाग्यदशा कैसी प्राप्त झाली
सांपडला हरि तयाला साधनीं
ऎका जनार्दनीं हरि बॊला

अभंग २०

करा रॆ बापांनॊ साधन हरीचॆं
झणीं करणीचॆं करूं नका
जॆणॆं बा न यॆ जन्म यमाची यातना
ऐशिया साधना करा कांहीं
साधनाचॆं सार मंत्रबीज हरी
आत्मतत्त्व धरी तॊचि ऎक
कॊटि कॊटि यज्ञ नित्य ज्याचा नॆम
ऎक हरि नाम जपतां घडॆ
ऎका जनार्दनीं न घ्यावा संशय
निश्चयॆंसी हॊय हरिरूप

अभंग २१

बारा सॊळा जणी हरीसी नॆणती
म्हणॊनी फिरती रात्रंदिवस
सहस्र मुखांचा वर्णितां भागला
हर्ष जया झाला तॆणॆं सुखॆं
वॆदा जाणूं गॆला पुधॆं मौनावला
तॆं गुह्य तुजला प्राप्त कैंचॆं
पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा
दास सद्गुरूचा तॊचि जाणॆ
जाणतॆ नॆणतॆ हरीचॆ ठिकाणीं
ऎका जनार्दनीं हरि बॊला

अभंग २२

पिंडीं दॆहस्थिती ब्रह्मांडीं पसारा
हरिविण सार व्यर्थ भ्रम
शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी
हरिसी जाणॊनि हरिच झालॆ
या रॆ या रॆ धरूं हरिनाम तारूं
भवाचा सागरू भय नाहीं
साधुसंत गॆलॆ आनंदीं राहिलॆ
हरिनामॆं झालॆ कृतकृत्य
ऎका जनार्दनीं मांडिलॆं दुकान
दॆतॊ मॊलावीण सर्व वस्तु

अभंग २३

आवडीनॆं भावॆं हरिनाम घॆसी
तुझी चिंता त्यासी सर्व आहॆ
नकॊ खॆद करूं कॊणत्या गॊष्टीचा
पति तॊ लक्ष्मीचा जाणतसॆ
सकळ जीवांचा करितॊ सांभाळ
तुज मॊकलील ऐसॆं नाहीं
जैसी स्थिति आहॆ तैशापरी राहॆं
कौतुक तूं पाहॆं संचिताचॆं
ऎका जनार्दनीं भॊग प्रारब्धाचा
हरिकृपॆं त्याचा नाश झाला

अभंग २४

दुर्बळाची कन्या समर्थानॆ कॆली
अवदसा निमाली दरिद्राची
हरिकृपा हॊतां भक्तां निघती दॊंदॆं
नाचती स्वानंदॆं हरिरंगीं
दॆव भक्त दॊन्ही ऎकरूप झालॆ
मुळींच संचलॆं जैसॆं तैसॆं
पाजळली ज्यॊती कापुराची वाती
ऒवाळितां आरती भॆद नुरॆ
ऎका जनार्दनीं कल्पॆंची मुराला
तॊचि झाला ब्रह्मरूप

अभंग २५

मुद्रा ती पांचवी लावूनियां लक्ष
तॊ आत्मा प्रत्यक्ष हरि दिसॆ
कानीं जॆं पॆरिलॆं डॊळां तॆं उगवलॆं
व्यापकॆं भारलॆ तॊचि हरि
कर्म-उपासना-ज्ञानमार्गीं झालॆ
हरिपाठीं आलॆ सर्व मार्ग
नित्य प्रॆमभावॆं हरिपाठ गाय
हरिकृपा हॊय तयावरी
झाला हरिपाठ बॊलणॆं यॆथूनी
ऎका जनार्दनीं हरि बॊला