Skip to content

गुरु हा संतकुळीचा राजा

GURU HA SANTAKULICHA RAJA

1 भाग · 28 ओळी

अभंग

गुरु हा संतकुळीचा राजा
गुरु हा प्राणविसांवा माझा
गुरुवीण देव दुजा
पाहातां नाहीं त्रिलोकीं ॥१॥
गुरु हा सुखाचा सागर
गुरु हा प्रेमाचा आगर
गुरु हा धैर्याचा डोंगर
कदाकाळी डळमळीना ॥२॥
गुरु वैराग्याचें मूळ
गुरु हा परब्रह्म केवळ
गुरु सोडवी तात्त्काळ
गांठ लिंगदेहाची ॥३॥
गुरु हा साधकाशीं साह्य
गुरु हा भक्तालागी माय
गुरु हा कामधेनु गाय
भक्ताघरीं दुभतसे ॥४॥
गुरु घाली ज्ञानाजंन
गुरु दाखवी निज धन
गुरु सौभाग्य देउन
साधुबोध नांदवी ॥५॥
गुरु मुक्तीचें मंडन
गुरु दुष्टाचें दंडन
गुरु पापाचे खंडन
नानापरी वारितसे ॥६॥
काया काशी गुरु उपदेशी
तारक मंत्र दिला आम्हाशीं
बापरखुमादेवीवराशी
ध्यान मानसी लागलें ॥७॥