Skip to content

हेचि थोर भक्ती आवडती देवा

HECHI THOR BHAKTI AVADATI DEVA

1 भाग · 8 ओळी

अभंग

हेचि थोर भक्ती आवडती देवा
संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविले अनंते तैसेचि रहावे
चित्ती असू द्यावे समाधान ॥२॥
वाहिल्या उद्देग दुःख ची केवळ
भोगणे ते फळ संचिताचे ॥३॥
तुका म्हणे घालू तयावरी भार
वाहू हा संसार देवापायी ॥४॥