अभंग
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवोनिया ॥१॥
तुळसी हार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजित ॥३॥
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥४ ॥
SUNDAR TE DHYAN
1 भाग · 4 ओळी