Skip to content

रूप पाहतां लोचनीं

ROOP PAHATA LOCHANI

1 भाग · 4 ओळी

अभंग

रूप पाहतां लोचनीं सुख झालें हो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ॥२॥
बहुतां सुकृतांची जोडी ह्मणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥
सर्व सुखाचें आगर बाप रखुमादेवीवर ॥४॥