Skip to content

संत एकनाथ कृत

SANT EKNATH KRIT MAHATMYA

1 भाग · 4 ओळी

श्रीज्ञानेश्वरी माहात्म्य

भाव धरूनियां वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी ॥१॥
स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेसीं ॥२॥
तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचें भय कळिकाळाचें नाहीं तया ॥३॥
एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी ॥४॥