Skip to content

संत नामदेव कृत

SANT NAMDEV KRIT MAHATMYA

1 भाग · 6 ओळी

श्रीज्ञानेश्वरी माहात्म्य

ज्ञानराज माझी योग्यांची माउली जेणें निगमवल्ली प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव भवार्णवीं नाव उभारिली ॥४॥
श्रवणाचे मिषें बैसावें येऊनी साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओंवी अनुभवावी ॥६॥