अभंग
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणे सोसे मन झाले हावभरी । परत माघारी येत नाही ॥ध्रु॥
बंधनापासुनी उकलली गाठी । देता आली मिठी सावकाश ॥२॥
तुका म्हणे देह भरिला विठ्ठल । काम क्रोधे केले घर रिते ॥३॥
BOLAVA VITTHAL PAHAVA VITTHAL
1 भाग · 4 ओळी