Skip to content

वारीयाने कुंडल हाले

WARIYANE KUNDAL HALE

1 भाग · 5 ओळी

अभंग

वारीयाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले ॥१॥
राधेला पाहून भुलले हरी बैल दुभवी नंदाघरी ॥२॥
हरिला पाहून भुलली चित्ता मंदिरी घूसळी डेरा रिता ॥३॥
फणस जंबीर कर्दळी दाट हाती घेऊनी शारंगपाट ॥४॥
मन मिळालेसे मना एका भुलला जनार्दना ॥५॥