Skip to content

गरुडाचे पायी

GARUDACHE PAYI

1 भाग · 8 ओळी

अभंग

गरुडाचे पायी
ठेवी वेळोवेळा डोई ॥१॥
वेगी आणावा तो हरी
मज दीनाते उध्दरी ॥२॥
पाय लक्ष्मीच्या हाती
म्हणोनि येतो काकुलती ॥३॥
तुका म्हणे शेषा
जागे करा ह्रषीकेशा ॥४॥