Skip to content

तुझिये संगति

TUJHIYE SANGATI

1 भाग · 4 ओळी

अभंग

तुझिये संगति जाली आमुची निश्चिति ॥१॥
नाहीं देखिलें तें मळे भोग सुखाचे सोहळे ध्रु
घरीं ताकाचें सरोवर येथें नवनीताचे पूर ॥२॥
तुका म्हणे आतां आम्ही न वजों दवडितां ॥३॥