अभंग
झणीं दृष्ट लागो तुझ्या सगुणपणा ।
जेणें माझ्या मना बोध केला ॥१॥
अनंता जन्मींचें विसरलो दु:ख ।
पाहतां तुझें मुख पांडुरंगा ॥ध्रु॥
योगियांच्या ध्यानीं ध्यातां नातुडसी ।
तो तू आम्हापाशी मागें पुढें ॥३॥
नामा म्हणें जीवें करीन निंबलोण ।
विटेसहित चरण ओंवाळीन ॥४॥