अभंग
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितीभाव ।
मी भक्त तू देव ऐसे करी ॥१॥
दावी मज रूप गोपिकारमणा ।
ठेवीन चरणांवरी माथा ॥२॥
पाहुनि श्रीमुख देईन आलिंगन ।
जीवे निंबलोण उतरीन ॥४॥
पुसता सांगेन हितगुज मात ।
बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥५॥
तुका म्हणे यासि न लावी उशीर ।
माझे अभ्यंतर जाणोनिया ॥६॥