अभंग
जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ । अंगी ऐसे बळ रेडा बोले ॥१॥
करील ते काय नोहे महाराज । परी पाहे बीज शुद्ध अंगी ॥२॥
जयाने घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवाची ॥३॥
तुका म्हणे तेथे सुखा काय उणे । राहें समाधाने चित्ताचिया ॥४॥
JAYACHIYE DWARI SONYACHA PIMPAL
1 भाग · 4 ओळी