अभंग
पिकलिया सेंद कडुपण गेले । तैसे आम्हां केले पांडुरंगे ॥१॥
काम क्रोध लोभ निमाले ठायिंची । सर्व आनंदाची सृष्टी जाली ॥२॥
आठव नाठव गेले भावभाव । जाला स्वयमेव पांडुरंग ॥३॥
तुका म्हणे भाग्य ह्या नावे म्हणीजे । संसारी जन्मीजें याची लागीं ॥४॥
PIKALIYA SEND KADUPAN GELE
1 भाग · 4 ओळी