Skip to content

सदा नाम घोष करुं हरिकथा

SADA NAAM GHOSH KARU HARIKATHA

1 भाग · 4 ओळी

अभंग

सदा नाम घोष करुं हरिकथा तेणें सदा चित्ता समाधान ॥१॥
सर्व सुख ल्यालों सर्व अलंकार आनंदें निर्भर डुलतसों ॥२॥
असो ऐसा कोठें आठवचि नाहीं देहींच विदेही भोगुं दशा ॥३॥
तुका म्हणे आम्ही झालों अग्निरुप लागों नेदूं पापपुण्य अंगा ॥४॥