अभंग
विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता ॥१॥
ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ध्रु॥
निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥२॥
तुका म्हणे आलें । रूपा अव्यक्त चांगलें ॥३॥
VISHWACHA JANITA
1 भाग · 4 ओळी