Skip to content

तुज पाहातां सामोरी

TUJ PAHATA SAMORI

1 भाग · 4 ओळी

अभंग

तुज पाहातां सामोरी दृष्टि न फिरे माघारी ॥१॥
माझें चित्त तुझ्या पायां मिठी पडिली पंढरिराया ध्रु.
नव्हे सारितां निराळें लवण मेळवितां जळें ॥३॥
तुका म्हणे बळी जीव दिला पायांतळीं ॥४॥